Police Recruitment 2022 : महत्त्वाची बातमी ! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी शिंदे सरकारकडून मुदतवाढ

पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) तयारी करणाऱ्या उमेदवारांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
Police Recruitment 2022 : महत्त्वाची बातमी ! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी शिंदे सरकारकडून मुदतवाढ

राज्यात जवळपास २० हजार पोलीस भरती केली जाणार (Police Recruitment) असल्याची घोषणा झाली. यासाठी अर्जदेखील मागवण्यात आले होते. इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिल्ली होती. मात्र, संबंधित वेबसाईटवर वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली गेली होती. यावर आता शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठा दिलासा दिला असून अर्ज भरण्याची मुदत ही १५ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, "पोलीस भरतीसाठी सरकारकडे ११ लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढ करणायचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येणार आहेत." अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in