खेडकर वापरत असलेली गाडी पोलिसांकडून जप्त
संग्रहित फोटो

खेडकर वापरत असलेली गाडी पोलिसांकडून जप्त

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर वापरत असलेली आलिशान गाडी रविवारी पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. या गाडीवर त्यांनी बेकायदेशीरपणे लाल दिवा लावला होता.
Published on

पुणे : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर वापरत असलेली आलिशान गाडी रविवारी पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. या गाडीवर त्यांनी बेकायदेशीरपणे लाल दिवा लावला होता.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गुरुवारी एका खासगी कंपनीवर नोटीस बजावली होती. पूजा खेडकर त्या कंपनीच्या नावाने नोंद असलेल्या ऑडी गाडीतून फिरत होत्या. नोंदणीकृत वापरकर्त्याचा पत्ता शिवणे गाव, हवेली तालुका असा होता. खेडकर यांनी गाडीवर लाल दिवा लावला होता आणि विनापरवानगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ असा फलकही लावला होता.

logo
marathi.freepressjournal.in