‘मविआ’ची ८० टक्के जागांवर सकारात्मक चर्चा; 'या' जागांचा तिढा कायम!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी मविआची वांद्रे येथील सोफिटॉल हॉटेलमध्ये बैठक पार पडली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी मविआची वांद्रे येथील सोफिटॉल हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत २८८ पैकी १२० ते १३० म्हणजे ८० टक्के जागांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र विदर्भातील जागांचा तिढा कायम असल्याचे ‘मविआ’च्या नेत्यांनी सांगितले.

पुन्हा एकदा ‘मविआ’ची जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. कुठल्या मतदारसंघात कुठल्या पक्षाची ताकद आहे, याचा आढावा घेण्यासाठी ‘एजन्सी’ची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास सर्व जागा त्याच पक्षाला जागावाटपात देण्याबाबत चर्चा झाली. परंतु, जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याचे एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. बैठकीत मुंबई, कोकण आणि त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाली.

विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल, लवकरात लवकर जागावाटपावर निर्णय घेण्यासाठी नेते प्रयत्न करीत आहेत, असेही ‘मविआ’च्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in