साखर निर्यात बंदीची शक्यता

साखर कारखान्यांच्या संघटनेची माहिती
साखर निर्यात बंदीची शक्यता

औरंगाबाद : यंदा समाधानकारक पाऊस न पडल्याने महाराष्ट्र व कर्नाटकात साखरेचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साखरेची निर्यात बंदी होऊ शकते, असा अंदाज साखर कारखान्यांच्या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, देशांतर्गत साखरेची मागणी पूर्ण होण्यासाठी साखर निर्यातीवर बंदी शक्य आहे. देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादनाचा अंदाज आहे, मात्र त्यात घट होऊ शकते. सध्या देशात ६५ लाख टन साखरेचा साठा आहे, तर देशाची साखरेची मागणी २७५ लाख टन आहे, तर ५० लाख टन साखर ही इथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाते, असे त्यांनी सांगितले.

देशातील २७५ लाख टन साखरेची मागणी पूर्ण करायला निर्यातीचे हत्यार उपसले जाऊ शकते. भारत हा कायम साखर निर्यात करत नाही. गेल्या दोन वर्षांत साखरेची जगात टंचाई होती. तेव्हा भारताने ६० लाख टन साखर निर्यात केली. यंदा इथेनॉल निर्मितीचे लक्ष्यही हुकण्याची चिन्हे दिसत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in