राज्याच्या राजकारणात भावी मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार पुढे येत आहेत. अजित पवार यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच भावी मुख्यमंत्री असतील, अशी पोस्टर्स आता नागपुरात लागले, त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
मला भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावणाऱ्यांनी ते काढावेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. असा मूर्खपणा भाजपच्या कोणी करू नये. हे काही अतिउत्साही लोकांनी केलेले काम असावे. काही लोक हे अशी कामे बातम्यांसाठी करतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 2024 मध्ये शिंदे हेच मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून जिंकू, असे ते म्हणाले.