स्टार्टअप सुरू करणाऱ्या नवसंशोधकांसाठी 'पॉवर २०२२' कार्यक्रम राबविण्यात येणार

मार्गदर्शनासोबतच ५ लाख रुपयांपर्यंतचा सीड फंड म्हणजेच बीज भांडवल मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे
स्टार्टअप सुरू करणाऱ्या नवसंशोधकांसाठी 'पॉवर २०२२' कार्यक्रम राबविण्यात येणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाच्या वतीने नवसंशोधकांसाठी 'पॉवर २०२२' हा कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनासोबतच ५ लाख रुपयांपर्यंतचा सीड फंड म्हणजेच बीज भांडवल मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

पॉवर २०२२ हा 'प्री इंक्यूनेशन' कार्यक्रम असून याअंतर्गत नव्या कल्पना, स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी नवसंशोधक तयार करणे, व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करणे, व्यवसाय सुरू करण्यासाठीच्या आवश्यक कायदेशीर बाबी याची माहिती या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येणार आहे.

'इनोव्हेशन सेल'च्या संचालिका डॉ.अपूर्वा पालकर म्हणाल्या, जे स्टार्टअप प्राथमिक अवस्थेत आहेत त्यांना अनेकदा मार्गदर्शनाची गरज असते, तसेच चांगल्या स्टार्टअपना पुढे जाण्यासाठी निधीचीही गरज असते. या 'पॉवर २०२२' च्या माध्यमातून आम्ही या दोन्ही गोष्टी देत आहोत. व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासोबत व्यवसाय सुरू करण्याची प्राथमिक माहिती कायदेशीर बाबी आदी या कार्यक्रमात शिकायला मिळतील. यात प्रवेश घेण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून 'आय टू ई' स्पर्धेतील स्पर्धकांनाही यामध्ये सहभागी होता येईल. 'आय टू ई' मधील स्पर्धकांसाठी याचे शुल्क ५ हजार असेल तर नव्याने नोंदणी करणाऱ्यांसाठी या कोर्सचे शुल्क १० हजार असेल. मागील वर्षी यामध्ये ६० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील २४ जणांनी त्यांची स्वतःची कंपनी सुरू केली आहे. तर दहा जणांना 'एसपीपीयू रिसर्च पार्क फाऊंडेशन' च्या माध्यमातून उभ्या राहत आहेत. तर पाच स्पर्धक हे गुंतवणुकीसाठी सज्ज आहेत, असेही डॉ.पालकर यांनी सांगितले. अर्ज करण्यासाठी लिंक http://seedfund.startupindia.gov.in ही आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in