यु-ट्यूबवर व्हिडीओ पाहून केला चोरीचा सराव

एटीएममधून पैसे काढणाऱ्या गँगला सापळा रचून अटक
File Photo
File Photo

शहराच्या विविध भागातील जवळपास ३३ एटीएममधून चोरून पैसे काढणाऱ्या एका गँगला पकडण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने एटीएममधून चोरी करण्याची माहिती मिळाली होती. ऑगस्टपासून पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते, माहिती तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी दिली. शेवटी सापळा रचून हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

या गँग मधल्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या जलेश्वर आणि प्रतापगड येथील रहिवासी राहुल राकेश सरोज, संजयकुमार शंकरलाल पाल आणि अशोक श्रीनाथ पाल अशी आरोपींची नावे आहेत. तर विनोद बडेलालसरोज,मोनू लल्लु सरोज या आरोपींसोबत तिघांनी नागपुरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोरट्यांनी यु ट्यूबवर चोरीचे व्हिडीओ पाहून चोरीचा सराव केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in