हनी ट्रॅप प्रकरण : प्रफुल लोढाविरोधात पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत असलेले आणि मुंबईत अनेक गुन्हे दाखल असलेले प्रफुल लोढा याच्याविरोधात आता पुणे शहरातही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनी ट्रॅप प्रकरण : प्रफुल लोढाविरोधात पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल
Published on

पुणे : हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत असलेले आणि मुंबईत अनेक गुन्हे दाखल असलेले प्रफुल लोढा याच्याविरोधात आता पुणे शहरातही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात एका ३६ वर्षीय महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या पतीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लोढाने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २७ मे रोजी रात्री पुण्यातील बालेवाडी भागातील पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये लोढाने हा प्रकार केला. लोढाने पतीला नोकरी देण्याचे आमीष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर तिने सहकार्य केले नाही तर तिची सध्याची नोकरीदेखील घालवण्याची धमकी लोढाने दिली होती. तक्रारदार महिला ही तिच्या घरात एकटीच कमावती असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. यासंदर्भात १७ जुलै रोजी लोढाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बावधन पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. ही घटना २७ मे रोजी घडली असताना, तक्रार इतक्या उशिरा का देण्यात आली, याबाबतही तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रफुल लोढा (वय ६२) सध्या मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांच्या कोठडीत आहे. बावधन पोलीस लवकरच लोढाला ट्रान्स्फर वॉरंटवर पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी ५ जुलै रोजी लोढाला अटक केली होती. प्रफुल लोढावर यापूर्वीही मुंबईत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नोकरीचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, त्यांना डांबून ठेवून धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात ‘पोक्सो’, बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. ३ जुलै रोजी साकीनाका पोलीस ठाण्यात, तर १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

महाजन - खडसे यांच्यात जुंपली

भाजप नेते गिरीश महाजन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सध्या चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रफुल लोढा याच्यासंदर्भात या दोघांमध्ये जुंपली आहे. गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅपचे आरोप असणाऱ्या प्रफुल्ल लोढाचा दाखला देत खडसेंवर त्यांच्या मुलाला संपवल्याचा आरोप केला होता. महाजनांच्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंमत असेल तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी’, अशी मागणी खडसेंनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in