प्रफुल्ल पटेल यांचं मुख्यमंत्री पदासंदर्भात मोठं वक्तव्य ; म्हणाले, "उद्धव ठाकरे..."

प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आता शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
प्रफुल्ल पटेल यांचं मुख्यमंत्री पदासंदर्भात मोठं वक्तव्य ; म्हणाले, "उद्धव ठाकरे..."

अजित पवार गटाच्या पहिल्या संकल्प मेळाव्याचं नागपूरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता राजकारणात उलटसुटल चर्चा सुरु झाल्या आहेत.

महविकास आघाडी सत्तेत असताना उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद मागितलं होतं, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शिवसेनेकडे ५६ आमदारांचं बळ होतं आणि राष्ट्रवादीकडे ५४ आमदार होते. त्यामुळे राष्ट्रवादीला दोन-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद पाहीजे हते. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंकडे गेलो असता ते काहीचं बोलले नाहीत. असं पटेल यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं यासंदर्भात चर्चा झाली त्यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे देखील उपस्थित होते. परंतु त्यांनी देखील मौन बाळगलं. यापूर्वी देखील राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. मात्र, मुख्यमंत्रीपद मिळालं नाहीस, ही खंत आहे. असं म्हणत पटेल यांनी काँग्रेसवर देखील आक्षेप नोंदवला. प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आता शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in