सरकार खोटं बोलतंय; पाकिस्तानचे पाणी बंद केले नाही - प्रकाश आंबेडकर

भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केलेले नाही, सरकार खोटं बोलत आहे, दिशाभूल करतं आहे, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केला.
सरकार खोटं बोलतंय; पाकिस्तानचे पाणी बंद केले नाही - प्रकाश आंबेडकर
Published on

पुणे : भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केलेले नाही, सरकार खोटं बोलत आहे, दिशाभूल करतं आहे, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केला. कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते, असेही ते म्हणाले.

काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समजताच भारताने देखील करारा जवाब देण्यासाठी महत्वाचे ५ निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानची पाणी कोडी करत सिंधू जल कराराला स्थगिती दिल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. मात्र आता २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केलेले नाही, सरकार खोटं बोलत आहे, दिशाभूल करतंय, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केला आहे. "कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते.

पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहेत

पाकिस्तानी नेत्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबवू शकत नाही. कारण ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहेत. आज आपले सैन्य पूर्णपणे तयार आहे. इस पार.. या उस पार. मात्र, पॉलिटिकल लीडरशिपमध्ये ती इच्छा दिसत नाही. त्यामुळे, सरकारमध्ये इच्छाशक्ती व्हावी यासाठी २ मे ला हुतात्मा स्मारकासमोर आपण निदर्शने करणार, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in