कंत्राटी भरतीवरुन प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका ; म्हणाले, "सत्ता दिल्यास..."

केंद्रासाठी UPSC आणि राज्यांसाठी MPSC या व्यतीरिक्त कुठलीही संस्था भरती करु शकत नसल्याचंही ते म्हणाले.
कंत्राटी भरतीवरुन प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका ; म्हणाले, "सत्ता दिल्यास..."

राज्य सरकारकडून सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळाच तर्क लाऊन या निर्णयाचं स्वागत केलं होतं. यानंतर अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी चतुर्वर्ण व्यवस्थेचं काम महाराष्ट्र शासनाने पुन्हा सुरु केल्याचं म्हणत कंत्राटी नोकर भरतीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. कंत्राटी भरतीती प्रक्रिया ही चतुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नोकर भरती करताना क्लास ३, क्लास ४ आणि टेक्निशियनची भरती ही कंत्राटी पद्धतीने केली जाते. ३-४ वर्षांनंतर त्यांना कामावरुन कमी केलं जातं. मात्र, क्लास २, क्लास १ आणि सुपर क्लासमध्ये कुठेही कंत्राटी पद्धत नही. त्यात परमनंट एम्प्लॉयी अशी परिस्थिती आहे. असा भेदभाव होत असल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले की, परमनंट एम्पलॉयीवर शासन सद्यस्थितीत २८ टक्के खर्च करतं. यापैकी २० टक्के खर्च हा क्लास १ आणि २ साठी आणि सुपर क्लास १ रँकच्या अधिकाऱ्यांसाठी केला जातो. तर उरलेला ८ टक्के खर्च हा क्लास ३ आणि ४ किंवा कंत्राटी टेक्निशियन यांच्यासाठी केला जातो, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

ते म्हणाले की, हा शासनाच्या प्रशासनातील चतुवर्ण भेद आहे. त्यास कुठलीही कायदेशीर मान्यता नाही. केवळ दोनच पद्धतीने शासकीय पदभरती केली जाऊ शकते. ती म्हणजे केंद्र सरकारसाठी युपीएससी आणि राज्यातील पदांसाठी एमपीएससीला. या व्यतीरिक्त कुठलीही संस्था भरती करु शकत नाही, असं ते म्हणाले.

सरकार आल्यास कंत्राटी भरती बंद करु

पुढील वर्षभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे राज्यातील सर्वच कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आवाहन करतो. येत्या लोकसभा आणि विधानसभेला वंचित बहुजन आघाडीच्या पाठिशी उभं रहा. आम्हाला सत्ता दिल्यास चे चातुर्वण व्यवस्था मोडीत काढू आणि कंत्राटी नोकरदारांसाठी परमनंटचा आदेश आम्ही काढू, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in