प्रकाश आंबेडकरांना ‘प्रेशर कुकर’, महादेव जानकरांना ‘शिट्टी’, दोघांनाही मिळाले निवडणूक चिन्ह

महाराष्ट्रात यंदाची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्ष फुटून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन नव्या पक्षांना मान्यता देण्यात आली असून त्यांना नवे निवडणूक चिन्हही देण्यात आले आहे.
प्रकाश आंबेडकरांना ‘प्रेशर कुकर’, महादेव जानकरांना ‘शिट्टी’, दोघांनाही मिळाले निवडणूक चिन्ह

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आले असून रासपचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून अमरावती मतदारसंघातून शड्डू ठोकलेल्या दिनेश बूब यांनाही शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात यंदाची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्ष फुटून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन नव्या पक्षांना मान्यता देण्यात आली असून त्यांना नवे निवडणूक चिन्हही देण्यात आले आहे. अशातच इतर छोट्या पक्षांना अद्याप निवडणुकीसाठी पक्षचिन्ह देण्यात आले नसून त्या पक्षांच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांचे वाटप निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. आयोगाने सोमवारी ही प्रक्रिया पूर्ण करत छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी चिन्हांचं वाटप केले.

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. वंचितने महाविकास आघाडीपासून वेगळे होत स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्याने काँग्रेसनेही अकोल्यात आपला उमेदवार दिला असून काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अकोल्यात यंदा तिरंगी सामना रंगेल.

परभणीत मशाल विरुद्ध शिट्टी

परभणी लोकसभा मतदारसंघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र निवडणूक आयोगाने शिवसेना हा मूळ पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्याने खासदार जाधव यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या नव्या चिन्हासह लढाईच्या मैदानात उतरवं लागलं आहे. त्यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार असणाऱ्या महादेव जानकर यांना आता शिट्टी हे चिन्ह मिळालं असून परभणीत काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in