प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचा 'या' चिन्हासाठी आग्रह; निवडणूक आयोगाकडे वंचितने तीन पर्याय सुचविले

वंचितचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने निवडणूक चिन्हासाठी...
प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचा 'या' चिन्हासाठी आग्रह; निवडणूक आयोगाकडे वंचितने तीन पर्याय सुचविले
Published on

मुंबई : वंचितचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने निवडणूक चिन्हासाठी भारत निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय सुचविले आहेत. त्यात गॅस सिलिंडर, शिट्टी आणि रोडरोलरचा समावेश आहे. यावर निवडणूक आयोगाकडून येत्या एक-दोन दिवसात निर्णय होऊ शकतो.

गॅस सिलिंडरसाठी आग्रह

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयोगाला तीन निवडणूक चिन्हांची यादी दिली. वंचित आघाडीने गेली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक गॅस सिलिंडर या चिन्हावर लढवली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी हेच चिन्ह मिळावे, असा वंचितचा आग्रह आहे. आम्ही निवडणूक आयोगाला चिन्हाची यादी सादर केली आहे. त्यावर येत्या दिवसात अंतिम निर्णय घेऊ, असे आयोगाने सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे आता वंचितला कोणते निवडणूक चिन्ह मिळते हे पहावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in