"रोहित पवारांमध्ये मॅच्युरिटी...'; सोलापूर लोकसभेच्या जागेवरून रोहित पवार - प्रणिती शिंदेंमध्ये वाकयुद्ध

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता, त्यानंतर हे वाकयुद्ध सुरु झाले
"रोहित पवारांमध्ये मॅच्युरिटी...'; सोलापूर लोकसभेच्या जागेवरून रोहित पवार - प्रणिती शिंदेंमध्ये वाकयुद्ध

महाविकास आघाडीच्या आणखी २ नेत्यांचा वाद समोर आला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर मतदारसंघावर दावा केला होता. याबद्दल काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना विचारले असता, "कोण रोहित पवार?" असे म्हणत त्यांना खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या, "रोहित पवार यांची ही पहिलीच टर्म आहे. काहींमध्ये असतो पोरकटपणा, थोडे दिवस थांबा, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल," असे म्हणत रोहित पवारांना टोला लगावला.

सोलापूर लोकसभेची जाग ही काँग्रेसकडून लढवली जाते. मात्र, रोहित पवारांनी यावर दावा केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून आता दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगलेले पाहायला मिळाले. रोहित पवार म्हणाले होते की, "सोलापूरची जाग काँग्रेसकडे राहणार की राष्ट्रवादी लढणार याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल." त्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका करत, 'आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ मागू' असे म्हणत टोला लगावला होता. यानंतर प्रणिती शिंदेंनी त्यांच्यावर टीका करताना, रोहित पवार अजून मॅच्युअर नाहीत असे म्हणत टीका केली.

logo
marathi.freepressjournal.in