Ram Satpute Vs Praniti Shinde : समाजात फूट..., प्रणिती शिंदेचा राम सातपुतेंवर उपरोधिक टोला

भाजपच्या पाचव्या यादीत भंडारा गोंदियातून सुनील बाबूराव मेंढे, गडचिरोलीमधून अशोक महादेव आणि सोलापुरातून राम सातपुतेंचा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुहेरी लढत पहायला मिळणार आहे.
Ram Satpute Vs Praniti Shinde : समाजात फूट..., प्रणिती शिंदेचा राम सातपुतेंवर उपरोधिक टोला
Published on

मुंबई : लोकसभेसाठी भाजपची पाचवी यादी जाहीर झाली आहे. यात भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचे सोलापूरात स्वागत करते, अशा शब्दात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना शुभेच्छा देणारे पत्र सोशल मीडियावर ट्वीट केले आहे. या पत्रातून प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंवर उपरोधिक टोला देखील लगावला आहे. प्रणिती शिंदेचे पत्र हे भीती पोटी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर राम सातपुतेंनी दिले आहे.

भाजपच्या पाचव्या यादीत महाराष्ट्राच्या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात भंडारा गोंदियातून सुनील बाबूराव मेंढे, गडचिरोलीमधून अशोक महादेव आणि सोलापुरातून राम सातपुतेंचा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुहेरी लढत पहायला मिळणार आहे.

प्रणिती शिंदेंनी पत्रात नेमके काय म्हणाल्या?

मा. राम सातपुते जी,

आपले सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारे शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मते मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचे सोलापूरात स्वागत करते.

तसेच ह्या उमेद्वारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणे अपेक्षित असते. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावे असे माझे मत आहे.

पुढील ४० दिवस याचे भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते.

सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते.

– प्रणिती सुशीलकुमार शिंदे

सोलापूरता भाजपचा विजय होणार - राम सातपुते

प्रणिती शिंदेच्या पत्राला राम सातपुतेंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देते म्हणाले, सोलपूरची जागाही भाजप जिंकणार आहे. त्या भीती पोटी काँग्रेसने केलेला केविलवाणा प्रयत्न दिसत आहे. सोलापूरकर अशा कोणत्याही गोष्टीला भीक घालणार नाहीत. सोलापूरकर विसरलेले नाही की, काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूना दहशतवादी म्हटले होते. त्यामुळे सोलापूरकर येत्या काळात सर्व गोष्टींचा हिशेब घेतील. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी देशात विकासाची गंगा आणली. त्यावर माझा विश्वास आहे की, सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने भाजपला विजयी करतील आणि त्यानंतर प्रणिती ताई असेच मोठे मन करून माझे अभिनंदन करतील. हा मला ताईंवर विश्वास आहे", असे राम सातपुते म्हणाले.

कोण आहेत राम सातपुते?

राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान आमदार आहेत. त्यासोबत भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीत राम सातपुते हे पहिल्यांदात आमदार झाले आणि आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. यामुळे सोलापूरता दुहेरी लढत पहायला मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in