"चितळ्यांची केतकी व जोगांचा पुष्कर यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा...", पुणे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी झापले

"घरी सर्वेक्षणासाठी येणारे कर्मचारी हे हौस म्हणून येत नाहीत, ते शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आदेशाने येताय. म्हणून शहाणपणा शिकवायचा असेल तर..."
"चितळ्यांची केतकी व जोगांचा पुष्कर यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा...", पुणे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी झापले

मराठा आरक्षणासंदर्भात २३ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू झाले आहे. पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण, जातगणना करत आहेत. मागासवर्ग आयोगाने दिलेल्या ॲपनुसार कर्मचाऱ्यांकडून माहिती विचारली जात आहे. अशात, अभिनेत्री केतकी चितळे हिने सर्वेक्षणासाठी पुण्यातील तिच्या घरी आलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली आणि आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली. तर, अभिनेता पुष्कर जोग यानेही, "माझी जात विचारणारे कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या" अशी पोस्ट केली होती. यावरून दोघांवरही टीकेचा भडीमार होत असताना आता पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोघांनाही खडेबोल सुनावलेत.

"तुमच्या घरी सर्वेक्षणासाठी येणारे कर्मचारी हौस म्हणून येत नाहीत, ते शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आदेशाने येत आहेत", अशी सोशल मीडिया पोस्ट करत जगताप यांनी दोघांनाही झापले. "चितळ्यांची केतकी व जोगांचा पुष्कर यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी...आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणारे कर्मचारी हे हौस म्हणून येत नाहीत, ते शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आदेशाने येताय. म्हणून शहाणपणा शिकवायचा असेल तर तो शिंदेंना शिकवा आणि कानाखाली मारायची असेल तर...." असे जगताप यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in