प्रतिभा पवार शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

यावेळी प्रतिभा पवार यांच्यासोबत शरद पवार देखील रुग्णालयात पोहचले आहेत
प्रतिभा पवार शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी त्यांना मुंबईच्या ब्रीज कँडी रुग्णायलात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी प्रतिभा पवार यांच्यासोबत शरद पवार देखील रुग्णालयात पोहचले आहेत.

प्रतिभा पवार यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिय केली जाणार आहे. याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं असून शरद पवार देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

logo
marathi.freepressjournal.in