गरोदर आदिवासी महिलेचा उपचाराअभावी मृत्यू ; विरोधकांनी केला सभात्याग

इगतपुरीमधील एका गरोदर आदिवासी महिलेल्या मृत्यूचा मुद्दा अधिवेशनात चर्चेला आल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली
गरोदर आदिवासी महिलेचा उपचाराअभावी मृत्यू ; विरोधकांनी केला सभात्याग

सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्यावरुन खडेजंगी पहायला मिळाली. आता इगतपुरीमधील एका गरोदर आदिवासी महिलेल्या मृत्यूचा मुद्दा अधिवेशनात चर्चेला आल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी बाळासाहेब थोरात यांनी नाशिकच्या इगतपुरीमध्ये एका आदिवासी गरोदर महिलेचा झालेल्या मृत्त्यूवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला. अडीच किमी पायपीट करत ही आदिवासी महिला मुख्य रस्त्यांपर्यंत पोहचली. त्यानंतर इगतपुरीच्या दवाखान्यात डॉक्टर नसल्याने ही महिला वाडीवरे गावात गेली. त्याठिकाणी तिची प्रकृती बघडल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व कामकाज बाजुला ठेवून चर्चेची मागणी केली.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्या आदिवासी महिलेचा मृत्यू झाला. याला शासन जबाबदार यामुळे सर्व कामकाज बाजुला सारून चर्चा घडवावी, अशी मागणी केली. तसंत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी देखील आक्रमक होत या मुद्यावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. यावेळी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहून देवेंद्र फडणवीसयांनी त्यावर आक्रमक भूमिका मांडली.

यावेळी "निवेदन देण्यात येईल, राजकीयच बोलायचं झालं, तर हे किती वर्ष सत्तेत होते? तेव्हा का नाही झालं. पण अशा गोष्टीत राजकीय बोलायचं नसतं. या गोष्टीवर कोणीही राजकारण करु नये. इथले काही नियम आहेत. एखाद्या पेपच्या बातमीवर इथे चर्चा घडत नसते. जर गांभीर्याने बोलायचं असेल तर सरकार यावर निवेदन करेल. त्यात काह कमतरता असेल तर चर्चा करायलाही सरकार तयार आहे", असं फडणवीस म्हणाले. मात्र, सरकारच्या भूमिुकेमुळे समाधान न झाल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in