स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीची तयारी सुरू; आघाडी मात्र कोमात

राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी जिल्हयात पक्ष विस्तारासाठी हालचाली सुरू केल्या असून या पक्षाचे नेते कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात इन कमिंगसाठी प्रयत्नशी राहणार असून त्याकरीता जिल्हयात लवकरच दौ-यावर येत आहेत.
अजित पवार, एकनाथ शिंदे (डावीकडून)
अजित पवार, एकनाथ शिंदे (डावीकडून)
Published on

विजय पाठक/ जळगाव

राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी जिल्हयात पक्ष विस्तारासाठी हालचाली सुरू केल्या असून या पक्षाचे नेते कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात इन कमिंगसाठी प्रयत्नशी राहणार असून त्याकरीता जिल्हयात लवकरच दौ-यावर येत आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या असून त्या स्वबळावर होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आपले पक्ष मजबूत करण्यामाठी राजकीय पक्षांच्या हालचालीस जिल्हयात वेग आला आहे. जिल्ह्यात भाजपा आज मजबूत स्थितीत असून गिरीश महाजन, मुग्धा खडसे, संजय मावकारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठका सातत्याने होत आहेत. बुथ रचना वर भर दिला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष अजित पवार गट देखील जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे माजी मंत्री व विदयमान आमदार अनिल भाइदास पाटील यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून त्यांना जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हयाचे प्रभारी म्हणून जिबाबदारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीत या नियुक्ती बद्दल आ. अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. अनिल पाटील यांनी जिल्ह्यातील संघटन वाढीचा व सभासद नोंदणीचा आढावा घेतला. येत्या काही दिवसांत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी आमदारांमह, अनेक माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, व जिल्हा परिषद मदम्य यांचा प्रवेश होउयु घातला असून या प्रवेशासंदर्भात बैठकीत नकारात्मक चर्चा झाली. ना. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येईल असे बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष योगेश देसले, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जळगाव शहराध्यक्ष अभिषेक पाटील, प्रदेश सरचिटणीम रवींद्र पाटीन हे उपस्थित होते.

शिवसेना शिंदे गटाची देखील राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठ होऊन त्यात पक्ष वाढीबाबत चर्चा झाली.

logo
marathi.freepressjournal.in