पुण्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्यांदाच पुण्यात आल्या होत्या.
पुण्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे दौऱ्यात देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्यांदाच पुण्यात आल्या होत्या. या भेटीत प्रतिभा पाटील यांनी त्यांना पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीची मूर्ती आणि शाल देऊन गौरविलं.

तसंच यावेळी प्रताप परदेशी आणि डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेल्या 'बाल रक्षण कायद्याचे(पोस्को) अंतरंग' या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती मुर्मू यांना प्रदान करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस, ग्रामविकासमत्री दादा भूसे, यांसह इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in