आमच्या तीन प्रमुख नेत्यांवर पक्ष सोडण्यासाठी दबाव, ईडी-एसीबीची कारवाई सूडबुद्धीने- संजय राऊत

उत्तर प्रदेशात अनेक मृतदेह गंगेत वाहत होते. गुजरातमध्ये स्मशानात जागा नव्हती. महाराष्ट्रात आम्ही हे सर्व कंट्रोल केले, लोकांना वाचवले, असेही राऊत सांगितले.
आमच्या तीन प्रमुख नेत्यांवर पक्ष सोडण्यासाठी दबाव, ईडी-एसीबीची कारवाई सूडबुद्धीने- संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि आमदार राजन साळवी यांच्यावर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरु आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. रविंद्र वायकर, सूरज चव्हाण आणि राजन साळवी या आमच्या तीन प्रमुख नेत्यांवर पक्ष सोडण्याचा दबाव टाकला जात आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

"सूरज चव्हाण आमच्या पक्षाचे सचिव आहेत. राजन साळवी आमदार आहे. ज्या प्रकारे यंत्रणांनी त्यांना अटक केली आहे. ते पूर्णपणे राजकीय बदल्याच्या भावनेतून आहे. आमच्या प्रमुख तीन नेत्यांवर पक्ष सोडण्यासाठी दबाव आहे. मात्र, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत रविंद्र वायकर, राजन साळवी, सूरज चव्हाण तिन्हीही झुकले नाहीत", असे संजय राऊत गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

कोविड काळात मुंबई महापालिकेने पूर्ण देशात चांगले काम केले. त्यावेळी लोकांना जगण्यासाठी आसरा हवा होता, जो आम्ही दिला. आपण इतक्या वर्षांनी हे काढत आहात आपल्याला लाज वाटायला हवी. उत्तर प्रदेशात अनेक मृतदेह गंगेत वाहत होते. गुजरातमध्ये स्मशानात जागा नव्हती. महाराष्ट्रात आम्ही हे सर्व कंट्रोल केले, लोकांना वाचवले, असेही राऊत सांगितले.

जे शिंदेंसोबत गेले त्यांच्यावर कारवाई नाही-

कोविड सेंटर आणि खिचडी वाटपात कोणताही घोटाळा झाला नाही. जे भाजपसोबत गेले त्यांना सोडून दिले. सूरज चव्हाण यांच्यासोबत त्यांचे एक सहकारीही होते, त्यांना सोडून दिले. ते शिंदेंसोबत गेल्याने त्यांना अटक केली नाही. मात्र, सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, आमदार साळवी यांच्या रत्नागिरी येथील घरी आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास एसीबीने चौकशीसाठी धाड टाकली. साळवी यांच्या चार मालमत्तांच्या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. यांचे घर, त्यांचे जुने घर, त्यांच्या भावाचे घर आणि त्यांच्या हॉटेलमध्ये धाडसत्र सुरू असल्याची माहिती साळवी यांनी दिली. त्यांच्याकडे बेकायदेशीर मालमत्ता सापडल्याने ही चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

तर, मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आज त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in