एकनाथ शिंदे यांच्यासाठी पंतप्रधान मोदींचे खास ट्विट

देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणास्थान असल्याचे मोदी म्हणाले
एकनाथ शिंदे यांच्यासाठी पंतप्रधान मोदींचे खास ट्विट
ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. आपल्या ट्विटमध्ये पीएम मोदी म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल मला एकनाथ शिंदेजींचे अभिनंदन करायचे आहे. ते तळागाळातील नेते आहेत, ते आपल्यासोबत समृद्ध राजकीय, विधिमंडळ आणि प्रशासकीय अनुभव घेऊन आले आहेत. महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेण्यासाठी ते काम करतील याची मला खात्री आहे.

आणखी एका वेगळ्या ट्विटमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणास्थान असल्याचे मोदी म्हणाले. त्यांचा अनुभव आणि कौशल्य सरकारसाठी एक संपत्ती आहे. ते महाराष्ट्राच्या विकासाची वाट आणखी मजबूत करतील, अशी मला खात्री आहे. अशा आशयाचे ट्विट मोदी यांनी महाराष्ट्रातील राजकीय सत्तापालट झाल्यावर केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in