पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २८ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर
Published on

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २८ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्यानिमित्त ४० एकरात जय्यत तयारी केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्यासाठी ३० विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. २००४ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना यवतमाळला आले होते. त्यांची जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. यानंतर २० मार्च २०१४ रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आले होते. तर, लोकसभा निवडणुकीपूर्वी १६ फेब्रुवारी २०१९ रोजी पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. 

logo
marathi.freepressjournal.in