पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापूर आणि पुण्यात सभा; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

पंतप्रधान मोदी हे आज (२९ एप्रिल) आणि उद्या (३० एप्रिल) असा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापूर आणि पुण्यात सभा; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद
Published on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापूर आणि पुण्यात सभा होणार आहे. भाजपचे सोलापूर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार राम सातपुते आणि पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ या दोघांसाठी पंतप्रधान मोदी हे सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा आज (२९ एप्रिल) आणि उद्या (३० एप्रिल) असा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींची प्रचारसभा ही सोलापुरातील होम मैदानावर आज दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

मोदी हे सोलापुरातील सभास्थळी होटगी रोड विमानतळावरील हेलिपॅडवर उतरून होम मैदावावर दाखल होणार आहे. मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी वाहतुकीत काही बदल केले असून सोलापूरकर आणि पुणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पंतप्रधानांची यांची पुण्यातील सभा ही आज सायंकाळी ४.४५ वाजता होणार आहे.

सोलापुरातील 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद

सोलापुरातील विमानतळ, महावीर चौक, सात रस्ता, आसरा चौक, व्होडाफोन गॅलरी,महिला हॉस्पिटल, आरडीसी कॉर्नर रंगभवन ते होम मैदान हे रस्ते दुपारी दीड ते चार वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट यार्ड आणि रंगभवन ते डफरीन चौक हे रस्ते देखील सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली आहे.

पुण्यातील 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार

  • बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद

  • टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद

  • सोलापूर रोडवरील अर्जुन रोड जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार रस्ता बंद

पुणेकरांसाठी 'हे' आहेत पर्यायी मार्ग

  • वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी.टी. कवडे रोडने इच्छित स्थळी

  • भैरोबानाला ते लुल्लानगर ते इच्छित स्थळी.

  • मोरओढा सदन कमांड कौन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी

logo
marathi.freepressjournal.in