पंतप्रधान तिसऱ्यांदा साईचरणी लीन ; वातानुकुलित दर्शन रांगेसह विविध विकासकामांचं लोकापर्ण

मोदींच्या आजच्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात त्यांच्या हस्ते ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्धाटन केलं आहे.
पंतप्रधान तिसऱ्यांदा साईचरणी लीन ; वातानुकुलित दर्शन रांगेसह विविध विकासकामांचं लोकापर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांचंआज दुपारी १ वाजेच्या सुमारास शिर्डीत आगमन झालं. त्यावेळी राज्याबाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. यानंतर मोदींनी साई मंदिरात जाऊ साई बाबांचं दर्शन घेतलं. मोदींच्या आजच्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात त्यांच्या हस्ते ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्धाटन केलं आहे. तसंच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ आणि निळवंडे धरणचे जलपूजन करुन कालव्याचं लोकार्पण होईल.

शिर्डीत आगमन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा केली. येथील दर्शनानंतर मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचं उद्धाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान निळवंडे धरणाचं जलपूजन आणि कालव्याचं लोकार्पण सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. तेथून शिर्डी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून मोदींच्याहस्ते आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल व वायू यांसारख्या क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी होत आहे.

मोदी तिसऱ्यांदा शिर्डीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा शिर्डीत आले आहेत. गुजरातचे पंतप्रधान असताना ते २००८ साली पहिल्यांदा शिर्डीत आले होते. त्यानंतर देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर २०१८ साली त्यांनी दुसऱ्यांना साईंचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आज २६ ऑक्टोबर २०२३ साली त्यांनी तिसऱ्यांदा साईंचं दर्शन घेतलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वातनुकुलित दर्शन रांगेचं देखील लोकार्पण देखील पार पडलं. याची पायाभरणी देखील त्यांनीच केली होती.

logo
marathi.freepressjournal.in