दहा लाखांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला अटक

वैद्यकीय महाविद्यालयात त्याला संस्थात्मक कोट्यातून प्रवेश मिळणार होता
दहा लाखांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला अटक

पुणे : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आशीष श्रीनाथ बंगीनवार (५४) यांना १० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

तक्रादाराच्या मुलगा यंदा ‘एनईईटी’ (नीट) परीक्षा यशस्वी उत्तीर्ण झाला. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात त्याला संस्थात्मक कोट्यातून प्रवेश मिळणार होता. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना तक्रारदाराचा संबंध अधिष्ठाता डॉ. बंगीरवार यांच्यासोबत आला. त्यांनी ॲॅडमिशनसाठी १६ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे विभागाकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचला. १० लाखांचा पहिला हप्ता घेताना डॉ. बंगीरवार यांना अटक केली.

या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

पोलीस अधीक्षक (एसीबी-पुणे) अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शीतल जानवे, उप पोलीस अधीक्षक नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

logo
marathi.freepressjournal.in