
मुंबई : महाराष्ट्रावर हिंदी भाषालादण्याचा वाद मुद्दाम पेटवला जात असून लोकांचे लक्ष मूलभूत प्रश्नांपासून दूर करण्यासाठी त्याला हवा दिली जात आहे, असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सरकारने शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी अधोरेखित केले.
शिक्षणासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठ्या प्रमाणात कपात झाली असल्याचा दावा करत चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विकास करणे यावर भर द्यायला हवा. शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवली पाहिजे. इंग्रजी आणि हिंदी लादण्यासंदर्भातील वाद निरर्थक आहेत.