कामरा, अंधारे यांच्या अडचणीत होणार वाढ; विशेषाधिकार समितीने हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला

विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणार कॉमेडियन कुणाल कामरा आणि त्याची पाठराखण करणाऱ्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे, कुणाल कामरा (डावीकडून)
सुषमा अंधारे, कुणाल कामरा (डावीकडून)
Published on

मुंबई : विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणार कॉमेडियन कुणाल कामरा आणि त्याची पाठराखण करणाऱ्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या दोघांविरोधात विधान परिषदेचे सदस्य प्रविण दरेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. अखेर शुक्रवारी विशेषाधिकार समितीने हा हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला आहे. तसेच या प्रकरणी दोन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस अंधारे आणि कामरा यांना बजावण्यात आली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, कामरा याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत विडंबनात्मक गाणे गायले. सुषमा अंधारे यांनी तेच गाणे बोलून दाखवताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सोशल मीडियावर बोलताना अंधारे यांनी उपमुख्यमंत्र्यांबाबत चुकीची भाषा वापरली. अंधारे यांनी दोन्ही सभागृहाचा अवमान आणि अपमान केला आहे, असा आरोप करत हक्कभंग मांडला.

logo
marathi.freepressjournal.in