उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाबाबत उद्धव ठाकरेंनी तसेच दैनिक सामनामध्ये प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातून...
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाबाबत उद्धव ठाकरेंनी तसेच दैनिक सामनामध्ये प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातून विधानसभा अध्यक्षांचा अवमान झाल्याचे सांगत भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला.

१० जानेवारी रोजी राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामध्ये नार्वेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला गेला होता, असे आमदार कदम यांनी सभागृहात सांगितले. विधीमंडळाला चोरमंडळ, तर विधानसभा अध्यक्षांना निवडणूक आयोगाचे डोमकावळे याशिवाय अग्रलेखात लोकशाहीची हत्या, काळा दिवस, दिल्लीहून लिहून आलेली स्क्रीप्ट असे शब्दप्रयोग केले गेले होते, असे सांगत राम कदम यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल केला. तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी विधानसभेच्या विशेषाधिकार भंग समितीकडे पाठविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in