पुरोगामी चळवळीचा कृतीशील कार्यकर्ता हरपला! प्रा. डॉ. हरी नरके यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पीलटलमध्ये वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
पुरोगामी चळवळीचा कृतीशील कार्यकर्ता हरपला! प्रा. डॉ. हरी नरके यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन
Published on

ज्येष्ठ लेखक, थोर विचारवंत समाता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. हरी नरके यांच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यांनी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पीलटलमध्ये वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. उद्या मुंबईत होणाऱ्या समता परिषदेच्या बैठकीसाठी हरी नरके आज पहाटे पुण्याहून मुंबईला येत असाताना त्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला. यांनंतर त्यांना तात्काळ बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांना तीव्र हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

नरके यांच्या जाण्याने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले, शाहु आंबेडकर यांच्या विचारांचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जात होतं. महाराष्ट्रा शासनाने महात्मा फुले समग्र हा एक हजार पानांचा ग्रंथ प्रकाशित केला होता. या ग्रंथांचे हरी नरके हे संपादक होते. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले होते. त्यातील ६ खंड हे प्रा. हरी नरके यांनी संपादन केले होते.

हरी नरके हे पुणे विद्यापीठात महात्मा फुले अध्यासनाचे प्राध्यापक होते. तसंच ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे उपाध्यक्ष पद देखील नरके भुषवत होते. 'महात्मा फुले यांची बदनामी : एक संशोधन' आणि 'महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा' ही दोन त्यांची प्रसिद्ध आणि गाजलेली पुस्तके होती. प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसींच्या न्या हक्कांसाठी लढणारा कृतीशील कार्यकर्ता गमावला असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होतं आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यीक आणि परिवर्नवादी चळवळीची कधीही न भरुन निघणारी हानी झाल्याची भावना वक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in