
कराड : सातारा जिल्हा परिषदेत सध्या पदोन्नतीचा मुद्दा गाजत असून काही कर्मचारी हे नियमानुसार पदोन्नती होत नसतानाही त्यांना पदोन्नती मागच्या काही वर्षांपूर्वी दिली गेली आहे. मात्र ती कशी दिली गेली ?,त्यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिल्याने शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांच्यातून होत असल्याने व ही बाब सध्या चर्चिली जात असताना पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणी केली असता त्या दरम्यान टायपिंगची कागदपत्रे बोगस जोडल्याचे १७ कर्मचारी आढळून आले होते. त्यांना नोटीस बजावल्या होत्या.त्यांनी खुलासे सादर केले असून त्यावर काय कार्यवाही होणार याकडे लक्ष लागून आहे.मात्र या वादग्रस्त विषयाबाबत काहीच सखोल चौकशी न करता पदोन्नतीच्या ३२ कर्मचाऱ्यांपैकी २९ कर्मचाऱ्यांना बुधवारी रात्री आठ वाजता पदोन्नती झाल्याची ऑर्डर देण्यात आल्याने जिप कर्मचाऱ्यांच्यात खळबळ उडाली आहे.