विठूरायाच्या वारकऱ्यांनाही मिळणार आर्थिक मदत, अर्थसंकल्पात काय तरतूद?

पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात खास तरतूद करण्यात आली आहे.
विठूरायाच्या वारकऱ्यांनाही मिळणार आर्थिक मदत, अर्थसंकल्पात काय तरतूद?
Published on

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा २०२३-२४ वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महायुती सरकारच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी २ वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये वारकऱ्यांसाठी खास तरतूदी करण्यात आल्या आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या अभंगानं भाषणाची सुरुवात...

सुरुवात 'उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, क्षेत्रमहिमे...' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगानं अजित पवारांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या, महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूतून प्रस्थान होत आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीतून निघेल."

वारकऱ्यांना काय मिळालं?

  • पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव

  • मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार

  • पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रति दिंडी २० हजार रुपये

  • निर्मल वारीसाठी ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी

  • मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गांवरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार

logo
marathi.freepressjournal.in