क्षयमुक्त गाव मोहिमेसाठी विकास आराखड्यात तरतूद

टीबीमुक्त पंचायत उपक्रमासाठी तरतूद करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत यांना देण्यात आल्या आहेत.
क्षयमुक्त गाव मोहिमेसाठी विकास आराखड्यात तरतूद

नांदेड : केंद्र शासनाच्या क्षयरोगमुक्त पंचायत मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी सबंध राज्यात मोहीम चालू आहे. केंद्र शासन आरोग्य विभाग व पंचायत राज विभाग यांच्या करारानुसार पंचायतराज संस्था व ग्रामपंचायत यांनी सदर मोहिमेत ग्रामपंचायत विकास आराखड्यांमध्ये क्षयरोग नियंत्रणासाठी निधीची तरतुदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखड्यात तरतूद ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत.

वर्ष २०२४-२५ चा ग्रामपंचायत विकास आराखडा बनविण्याचे काम गावस्तरावर सुरू आहे. यात टीबीमुक्त पंचायत उपक्रमासाठी तरतूद करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत यांना देण्यात आल्या आहेत.

क्षयरोगाची कमी संख्या विचारात घेता छोट्या ग्रामपंचायतींनी २० हजार रुपये तर मोठ्या ग्रामपंचायतींनी ५० हजार रुपयांपर्यंतची तरतूद करावी, ज्यात क्षय रुग्णांना उपचार व तपासण्यांसाठींचा प्रवास खर्च, रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणी, गावस्तरावर प्रचार प्रसिद्धी, बॅनर्स व पोस्टर स्पर्धांचे आयोजन तसेच रुग्णांना अतिरिक्त पोषण आहारासाठी आर्थिक मदत तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सहाय्य योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. वरील सर्व बाबीचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे-जाधव यांनी यशदा पुणे येथून पूर्ण केलेले असून, अंमलबजावणीसाठी तत्परतेने कार्य करण्याच्या उद्येशाने योग्य त्या बैठकाही घेतलेल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in