Pune Accident : पुण्यात भरधाव कारने पाच जणांचा उडवलं ; तीन जणांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

कार चालकाचे कारवरिल नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जात आहे.
Pune Accident : पुण्यात भरधाव कारने पाच जणांचा उडवलं ; तीन जणांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
Published on

पुण्यात एका भरधाव कारने पाच परप्रांतीय मजूरांना चिरडले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पाच पैकी तीन जणांना मृत्यू झाला तर दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण-नगर महामार्गावर हा अपघात झाला. जखमी दोघांवर सद्या पुण्यातील आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुर आहेत. हे मजूर कामासाठी काही दिवसांपूर्वी पुणे येथे आले होते. रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण-नगर मार्गावरील डिंगोरे येथील दत्त मंदिरा जवळील कठेश्वरी पुलालगत हा अपघात झाला. यात महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्य मजुरांची नावे आहेत. कार चालकाचे कारवरिल नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जात आहे.

अपघातची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात दोन जणांचा जागीच तर एकाचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. यात आणखी दोन मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे मजुर कामासाठी पुण्यात आले होते. रात्री घरी जात असताना हा अपघात झाला.

logo
marathi.freepressjournal.in