पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव, आता केंद्र सरकारकडे करणार पाठपुरावा

पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रस्तावित केले आहे.
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव, आता केंद्र सरकारकडे करणार पाठपुरावा
X
Published on

पुणे : पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रस्तावित केले आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाईल आणि मोहोळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याबाबत केंद्रात पाठपुरावा करतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.

मोदी गुरुवारी पुण्यात

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी पुण्यातील नव्या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन केले जाणार असून त्यानंतर मोदी उन्नतमार्गाची पायाभरणीही करतील, असेही फडणवीस म्हणाले. पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

चौपदरी मार्ग

पंढरपूर ते पुणे असा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग चौपदरी केल्याबद्दल फडणवीस यांनी गडकरी यांचे आभार मानले. या मार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होईल आणि हा संपूर्ण मार्ग पूर्ण केला जाईल. सत्र न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गाचे मोदींच्या हस्ते उ‌द्घाटन केले जाईल. त्याचप्रमाणे स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत मार्गाचे आणि पिंपरी-चिंचवड ते निगडी या उन्नत मार्गाची पायाभरणी मोदी करतील, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in