Pune ATS : पुण्यात १९ ठिकाणी एटीएसच्या धाडी

पुणे इसिस मॉड्यूलप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत बुधवारी रात्री कोंढवा परिसरात तब्बल १९ ठिकाणी धाडी टाकल्या. या शोधमोहिमेदरम्यान अनेक संशयितांना एटीएसने ताब्यात घेतले आहे.
Pune ATS : पुण्यात १९ ठिकाणी एटीएसच्या धाडी
Published on

मुंबई : पुणे इसिस मॉड्यूलप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत बुधवारी रात्री कोंढवा परिसरात तब्बल १९ ठिकाणी धाडी टाकल्या. या शोधमोहिमेदरम्यान अनेक संशयितांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. कोंढवा, खडकी, वानवडी आणि भोसरी येथील १९ संशयित व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकत मुंबई आणि पुण्यातील एटीएस पथकांनी मॉड्यूलच्या नेटवर्कशी जोडलेले डिजिटल पुरावे, कागदपत्रे आणि उपकरणे शोधण्यासाठी एकाच वेळी शोधमोहीम राबवली. इसिसचा कार्यकर्ता तल्हा लियाकत अली खान (३७) याच्याशी जवळचे संबंध असलेल्या संशयितांच्या घरांवर हे छापे टाकण्यात आले.

२०२२, २३ मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या संदर्भात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दहशतवादविरोधी पथक काही संशयितांवर नजर ठेवून होते.

logo
marathi.freepressjournal.in