Pune Auto Strike : पुण्यातील रिक्षा संप मागे; पण हजारो रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल

पुण्यात रिक्षाचालक संघटनानी पुकारलेला बेमुदत संप अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. पण त्यानंतर आता पोलिसांनी कारवाईला केली सुरुवात
Pune Auto Strike : पुण्यातील रिक्षा संप मागे; पण हजारो रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल
Published on

पुण्यामध्ये रिक्षाचालक संघटनांनी बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात २८ नोव्हेंबरला बेमुदत संप पुकारला होता. अखेर शासनाच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. मात्र, आता आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तब्बल २,५०० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

२८ नोव्हेंबरला विविध संघटनांच्या रिक्षाचालकांनी संप केला. यावेळी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. तसेच, त्यादिवशी काहींनी हजारो रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयासमोर हे आंदोलन केले होते. त्यामुळे आता विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम ३४१नुसार गुन्हा दाखल केला असून वाहतुकीस अडथळा, नियमभंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in