Pune Bandh : छत्रपती शिवरायांच्या अपमानाविरोधात आज पुण्यामध्ये मूक मोर्चा; भाजप वगळता इतर सर्व संघटनांचा पाठिंबा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात पुण्यामध्ये (Pune Bandh) आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून मूक मोर्चा काढण्यात आला
Pune Bandh : छत्रपती शिवरायांच्या अपमानाविरोधात आज पुण्यामध्ये मूक मोर्चा; भाजप वगळता इतर सर्व संघटनांचा पाठिंबा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विरोध म्हणून पुण्यामध्ये (Pune Bandh) कडकडीत बंदची हाक दिली आहे. या बंदला भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही त्यांच्यावर भाजपने कारवाई केली नाही. त्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी ही बंदची हाक दिली. विशेष म्हणजे, निषेध म्हणून काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील उपस्थिती दर्शवली. शहरातील बहुतांश दुकाने, हाॅटेल सकाळपासून बंद होती. बंदमुळे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

पुण्यातील बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून यामध्ये अनेक संघटनानी 'राज्यपाल हटाव'च्या घोषणा दिल्या. तसेच, यावेळी काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सहभागी झाले होते. त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींना पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तर, दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील पुण्यातील या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. या पुण्यातील बंदमध्ये महाविकास आघाडीतीळ नेत्यांसह अनेक सामाजिक संघटना सहभागी झाले आहेत. यामध्ये अनेक महिलांसह अंदाजे ४० मुस्लिम संघटनादेखील सहभाग दर्शवला आहे. पुण्यामध्ये ३ वाजेपर्यंत दुपारपर्यंत सर्व मार्केट, दुकाने बंद राहणार असून शाळा, महाविद्यालय चालू राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in