Pune : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आगमन मिरवणूक

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते सोमवारी (दि. १४) दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
Pune : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आगमन मिरवणूक
Pune : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आगमन मिरवणूक
Published on

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते सोमवारी (दि. १४) दुपारी १२.३० वाजता होणार आहे. त्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मंडळाचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाप्पाची आरती झाल्यानंतर सकाळी ८.१५ वाजता उत्सव मंडपातून श्रींच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधिनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शिवाय, इंद्रगर्जना आणि केशव शंखनाद ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. याशिवाय आढाव बंधूंचा नगरखाना आणि मर्दानी खेळ हेही मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहेत.

सकाळी सव्वाआठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. भवनापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने मिरवणूक बुधवार चौकात पोहोचेल. तेथून तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक आणि बाजीराव रस्ता मार्गे मिरवणूक गणेश सुवर्णधाम या सजावट मंदिरात दाखल होईल.

यानंतर दुपारी १२.३० वाजता जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी सांगितले.

सर्व गणेशभक्तांनी उपस्थित राहावे - पुनीत बालन

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत-गाजत आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भक्तिमय सोहळ्यास सर्व गणेशभक्तांनी उपस्थित राहावे, ही विनंती, असे आवाहन पुनीत बालन यांनी केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in