भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना झटका; पत्नीसह जावयाच्याही अडचणीत वाढ

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात दोषमुक्त करण्याची विनंती करत सत्र न्यायालायात धाव घेतलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांना विशेष न्यायालयाने झटका दिला. कोर्टाने खडसे यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज फेटाळून लावला आणि आरोप निश्चित करण्यासाठी सुनावणी १८ डिसेंबर रोजी निश्चित केली असून सुनावणीला तिन्ही आरोपींना उपस्थित रहावे लागणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात दोषमुक्त करण्याची विनंती करत सत्र न्यायालायात धाव घेतलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांना विशेष न्यायालयाने झटका दिला.

विशेष सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी माजी मंत्री खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज फेटाळून लावला. खासगी फायद्यासाठी सरकारी तिजोरीचे नुकसान करण्याचा "अप्रामाणिक हेतू" होता असे न्यायालयाने नमूद केले. एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्री म्हणून त्यांच्या पदाचा "अयोग्य फायदा" घेतल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे स्पष्ट करत आरोप निश्चित करण्याचे आदेश कोर्टाने दिले. तसेच, आरोप निश्चित करण्यासाठी सुनावणी १८ डिसेंबर रोजी निश्चित केली असून सुनावणीला तिन्ही आरोपींना उपस्थित रहावे लागणार आहे.

पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकत्याने केली होती. त्या तक्रारीच्या आधारे एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्याने खटल्याला वेग येण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in