पुणे लघुशंका प्रकरण; दोघांना पोलीस कोठडी

पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून रस्त्यावरील सिग्नलवर लघुशंका करणारा कारचालक आणि त्याचा सहप्रवासी या दोघांना न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे लघुशंका प्रकरण; दोघांना पोलीस कोठडी
Published on

पुणे : पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून रस्त्यावरील सिग्नलवर लघुशंका करणारा कारचालक आणि त्याचा सहप्रवासी या दोघांना न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गौरव आहुजा (२५) आणि भाग्येश ओसवाल (२२) या दोघांवर गुन्हा दाखल केला. शनिवारी पोलिसांनी ओसवालला त्याच्या घरातून अटक केली. आहुजा हा कार चालवत होता. सातारा जिल्ह्यातील कराड येथून त्याला रविवारी सकाळी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, ओसवाल हा महागड्या कारमध्ये पुढच्या बाजूला बसलेला दिसत आहे, तर आहुजा हा वाहतूक सिग्नलवर थांबून लघुशंका करत आहे. त्यानंतर तो कारच्या चालकाच्या सीटवर जातो आणि व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीकडे अश्लील हावभाव करत वाहन भरधाव पुढे नेतो. आहुजा आणि ओसवाल यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आहुजा आणि ओसवाल यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

logo
marathi.freepressjournal.in