Pune : पुण्यात दुपारी १ वाजेपर्यंत झाले इतके टक्के मतदान

सध्या पुण्यात (Pune) कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु असून नागरिकांनी सुरुवातील चांगला प्रतिसाद दाखवला
Pune : पुण्यात दुपारी १ वाजेपर्यंत झाले इतके टक्के मतदान
@ANI
Published on

पुण्यामध्ये (Pune) कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीच्या निकाल हा २ मार्चला लागणार असून सर्वानाच उत्सुकता लागली आहे. कारण, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये ही सरळ लढत असून कोण बाजी मारतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

कसबा पेठ मतदारसंघात आज १ वाजेपर्यंत १८.५ टक्के मतदान झाले. तर, दुसरीकडे चिंचवड मतदारसंघात २०.६८ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, कसबा पेठमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. तर, दुसरीकडे चिंचवड मतदारसंघात भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in