पुणेकरांची वाहतूककोंडीपासून सुटका; डबलडेकर पूल सुरू, ब्रिजला अजितदादांचे नाव

सध्या झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहरात वाहतूककोंडीची मोठी समस्या असून राज्यकर्ते या वाहतूक कोंडीपासून सुटकेसाठी प्रयत्नशील आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिक प्रयत्नशील होतेमात्र, त्यांचे दुर्दैवी निधन झाले. आता, त्यांनीच मांडलेल्या संकल्पनेतून पुण्यात डबलडेकर पुल साकारला आहे.
पुणेकरांची वाहतूककोंडीपासून सुटका; डबलडेकर पूल सुरू, ब्रिजला अजितदादांचे नाव
पुणेकरांची वाहतूककोंडीपासून सुटका; डबलडेकर पूल सुरू, ब्रिजला अजितदादांचे नाव
Published on

पुणे : सध्या झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहरात वाहतूककोंडीची मोठी समस्या असून राज्यकर्ते या वाहतूक कोंडीपासून सुटकेसाठी प्रयत्नशील आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिक प्रयत्नशील होतेमात्र, त्यांचे दुर्दैवी निधन झाले. आता, त्यांनीच मांडलेल्या संकल्पनेतून पुण्यात डबलडेकर पुल साकारला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले.

नागरिकांचा प्रवास होणार अधिक सुलभ

या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे, विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह पुणेकरांनाचीही सोय होईल. विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, विद्यापीठ रस्ता, पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. आता, पुण्याच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. ‘२०२० साली मी महापौर होतो, अजितदादा पालकमंत्री होते. त्यावेळी ही कल्पना समोर आली होती. दुहेरी पुलाचा विचार करायला हवा. त्यात वरून मेट्रो, पूल आणि खाली रस्ता तयार करावा, असा निर्णय झाला होता’, अशी माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुलास अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी

अजित पवार यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला होता. देवेंद्र फडणवीस यांनीही या विकासकामासाठी साथ दिली. अजित पवार यांनी जो विचार केला होता, त्यांची दूरदृष्टी होती की याची निर्मिती करताना एकत्रित हा पूल व्हावा, त्यानुसार थोड्या दिवसांनी मेट्रो देखील धावेल. अजित पवार यांना आम्ही आज खूप मिस केले आहे, अशी भावना भाजप नेते आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलताना व्यक्त केली. तसेच, या पुलास अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी देखील त्यांनी केली.

पुलावर अजितदादांचे डिजिटल बॅनर

दरम्यान, अजित पवारांच्या अनुपस्थितीत पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे डिजिटल बॅनर या पुलावर झळकावल्याचेही पुलावर पाहायला मिळाले, त्यामुळे अजित दादांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. दरम्यान, अजित पवारांच्या अनुपस्थितीत पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे डिजिटल बॅनर या पुलावर झळकावल्याचही पुलावर पाहायला मिळाले, त्यामुळे अजित दादांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

logo
marathi.freepressjournal.in