पुण्यात युतीत बिघाडी, प्रत्येक पक्ष स्वतंत्र रणधुमाळीत

शहरातील प्रमुख राजकीय पक्षांमधील युती आणि आघाड्या केवळ कागदावरच उरल्याचे चित्र दिसत असून, जागावाटपावरून निर्माण झालेला पेच अखेरच्या क्षणापर्यंत सुटलेला नाही. विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही मोठ्या आघाड्यांमध्ये बिघाडी झाल्याने पुण्याचे राजकीय मैदान आता पूर्णपणे विखुरलेले आहे.
PMC Pune Corporation
Published on

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत शहराचे राजकीय वातावरण अत्यंत तापलेले आहे. यंदा बहुरंगी आणि चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांमधील युती आणि आघाड्या केवळ कागदावरच उरल्याचे चित्र दिसत असून, जागावाटपावरून निर्माण झालेला पेच अखेरच्या क्षणापर्यंत सुटलेला नाही. विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही मोठ्या आघाड्यांमध्ये बिघाडी झाल्याने पुण्याचे राजकीय मैदान आता पूर्णपणे विखुरलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील युतीही फक्त औपचारिक राहिल्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने शरद पवार गटाला केवळ ४० जागा देण्याचा दावा केला होता, तर स्वतः १२५ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. मात्र, शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितले की, त्यांनी ७० पेक्षा जास्त उमेदवारांना 'एबी' फॉर्म दिला आहे. या विरोधी दाव्यांमुळे अनेक प्रभागांमध्ये दोन्ही गटांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे ही आघाडी फक्त नावापुरती राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजप-शिंदे गट युती तुटली

दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युतीही अखेरच्या क्षणापर्यंत टिकलेली नाही. पुण्यातील सर्व १६५ जागांवर शिंदे गटाने ‘एबी’ फॉर्म वाटल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे नेते उदय सामंत आणि विजय शिवतरे उमेदवारांना माघार घ्यायला सांगत असले तरी, अधिकृत अर्ज भरल्यानंतर उमेदवार सहज माघार घेतात असे राजकीय निरीक्षक मानत नाहीत. परिणामी, भाजप आणि शिंदे गट आता अनेक जागांवर एकमेकांविरुद्ध मैदानात आहेत.

पुण्यात बहुरंगी निवडणूक

सर्व घडामोडींमुळे पुण्यात कोणतीही भक्कम युती शिल्लक राहिलेली नाही. भाजप स्वतंत्रपणे आपली ताकद आजमावत आहे, तर अजित पवार आणि शरद पवार यांचे गटही स्वतंत्र उमेदवार उभे करत आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील स्वबळावर मैदानात उतरली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र फळीने सक्रिय आहे. यामुळे पुण्यातील महापालिका निवडणूक खऱ्या अर्थाने “मल्टी-कलर” किंवा बहुरंगी लढत ठरली आहे, ज्यामुळे मतदारांमध्येही मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यातील महापालिका निवडणूक सुरू असताना भाजप आणि शिवसेनेने आपापले ‘एबी’ फॉर्म दिले असले तरी, याचा अर्थ महायुती तुटली असा होतो. पुण्यासह राज्यातील कुठेही महायुती तुटलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांनी पुण्यात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेसाठी जागावाटप निश्चित झाले असून, तिथे भाजप आणि रिपाई १३७ जागांवर, तर शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यांनी मनसेवरही टीका केली की, मनसेला हव्या असलेल्या जागा न देता फक्त ४३-४५ जागांवर त्यांचे उमेदवार लढवले जात आहेत.भाजप आणि शिवसेनेने आपापले ‘एबी’ फॉर्म दिले असले तरी याचा अर्थ युती तुटली असा नाही. पुण्यातील जागावाटपाबाबत स्थानिक नेते विजय बापू शिवतारे, नीलम गोऱ्हे, आबा बागुल यांच्यासह विचारविनिमय करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

उदय सामंत, उद्योग मंत्री शिवसेना शिंदे गट

logo
marathi.freepressjournal.in