खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष

कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात गुंड निलेश घायवळसह सर्व आरोपींची विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विशेष मोका न्यायाधीश साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.
खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष
खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोषसंग्रहित छायाचित्र
Published on: 

पुणे : कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात गुंड निलेश घायवळसह सर्व आरोपींची विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विशेष मोका न्यायाधीश साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.

प्रकरणातील माहितीनुसार, २०२० मध्ये निलेश घायवळ एका अन्य गुन्ह्यात कारागृहात असताना संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे ‘भावाच्या रॅलीसाठी जीप हवी आहे’, अशा स्वरूपात खंडणीची मागणी केल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी केला होता.

मात्र, त्यानंतर फिर्यादीने पोलीस आणि तपास यंत्रणेवर गंभीर आरोप करत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. आपल्यावर दबाव टाकून फिर्याद नोंदविण्यात आल्याचा दावा त्याने केला होता. उच्च न्यायालयात दाखल याचिकेनंतर फिर्यादीचा पुन्हा जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले. या जबाबातही त्याने खंडणीचा प्रकार नाकारला.

विशेष मोका न्यायालयातील सुनावणीदरम्यानही फिर्यादीने मूळ फिर्याद नाकारली. इतर साक्षीदार आणि पंचांनीही अभियोजन पक्षाच्या घटनाक्रमाला दुजोरा दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने निलेश घायवळ, संतोष धुमाळ, मुसा शेख, अक्षय गोगावले, कुणाल कंधारे आणि विपुल माझीरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in