Pune : ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून तरुणीचा छळ; भोंदू बाबासह सहा जणांना अटक

स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून एका ५९ वर्षीय भोंदू बाबाने उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune : ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून तरुणीचा छळ; भोंदू बाबासह सहा जणांना अटक
Pune : ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून तरुणीचा छळ; भोंदू बाबासह सहा जणांना अटक'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पुणे : स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून एका ५९ वर्षीय भोंदू बाबाने उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राधामोहन मिश्रा असे या मुख्य आरोपीचे नाव असून, त्याने तरुणीला ओलीस ठेवून तिचे अमानुष शोषण केले. याप्रकरणी खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्रासह त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन आणि अन्य सहा महिलांना अटक केली आहे. पीडित तरुणी पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत असून, आरोपींनी २००१ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हरियाणा आणि पुणे परिसरात हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Pune : ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून तरुणीचा छळ; भोंदू बाबासह सहा जणांना अटक
गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

स्वामी कंवल नयनच्या माध्यमातून पीडितेच्या कुटुंबाची ओळख पंचकुला येथील गुरुदेव साधना धाम ट्रस्ट चालवणाऱ्या राधामोहन मिश्राशी झाली होती. मिश्रा हा साक्षात ईश्वराचा अवतार असल्याचा बनाव रचून त्याने भाविकांची दिशाभूल केली. याच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन आरोपींनी तरुणीला पतीपासून वेगळे केले आणि तिची सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. तिला कुटुंबापासून वेगळे पाडून अमानुष शारीरिक व मानसिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. छळाला कंटाळलेल्या तरुणीने धाडस दाखवून पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली जवळील उबाळेनगर येथील आश्रमावर छापा टाकून पोलिसांनी झडती घेतली.

logo
marathi.freepressjournal.in