Pune : पुण्यात अग्नितांडव : ३ दुकाने आगीत जळून खाक

आज प्रजासत्ताक दिनी पुण्यामध्ये (Pune) अग्नितांडव पाहायला मिळाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही
Pune : पुण्यात अग्नितांडव : ३ दुकाने आगीत जळून खाक

एकीकडे देशभरात प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साह पाहायला मिळाला तर दुसरीकडे पुणेकरांना (Pune) अग्नितांडवाची अनुभूती मिळाली. स्वारगेट परिसरात दुपारच्या सुमारास ३ दुकानांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली. यामध्ये भंगाराचे दुकान, गादी घर आणि रद्दी डेपोची दुकाने जाळून खाक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुकानात काम सुरु असताना गॅस कटरच्या आगीच्या ठिणगीने ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने पाचारण केले आणि शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवण्यात त्यांना यश आले.

दुकानामध्ये लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, तीनही दुकाने आगीत जळून खाक झाली. गॅस कटरच्या आगीच्या ठिणगीने लागलेल्या आगीने मोठे रूप धारण केले. शेजारी असणाऱ्या भंगार दुकान आणि रद्दी डेपोमध्ये ही आग पसरली. स्वारगेटचा हा भाग मोठ्या वर्दळीचा असतो. त्यामुळे तात्काळ अग्नीशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अग्नीशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in