

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाल्याने शहर हादरून गेले. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर आंदेकर टोळीने पिस्तुलातून गोळ्या झाडत धारदार कोयत्याने वार केल्याने मोठी खळबळ उडाली. पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात राजषी शाहू बँकेसमोरील एका हॉटेलसमोर बुधवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेत संबंधित २६ वषीय तऊण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी ऊग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अक्षय उर्फ बाळा बापू म्हस्के (२६) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर आरोपींनी पिस्तुलमधून चार राऊंड फायर केले. त्यातील दोन गोळ्या त्याला लागल्या. एक गोळी त्याच्या छातीला घासून गेल्याने तो रस्त्यावर पडला, तर दुसरी गोळी त्याची मांडीत शिरली. त्याचबरोबर धारदार शस्त्राने त्याच्या तोंडावर, डोक्मयात व छातीवर तीन ते चार वारदेखील करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर खून प्रकरणात अक्षय म्हस्के याचा भाऊ आकाश याला अटक करण्यात आली होती.
खून प्रकरणातील आरोपींना आकाश म्हस्के याने मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिली होती. त्यानंतर आकाश याला खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. आकाश याचा भाऊ अक्षय हा रिक्षाचालक असून तो रोज कात्रज ते स्वारगेट दरम्यान रिक्षा व्यवसाय करतो. पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी तो नाष्टाघर हॉटेल याठिकाणी आला होता. राजषी शाहू बँक चौकात तो रिक्षातच मागील सीटवर थांबला होता. त्या वेळी पाठलाग करत दोन दुचाकीवऊन आलेल्या पाच हल्लेखोरांनी अक्षय याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली.