Pune Gas Tank Blast: पुण्यात गॅसचोरी करताना स्फोट ; सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र....

रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Pune Gas Tank Blast: पुण्यात गॅसचोरी करताना स्फोट ; सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र....
Published on

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी मोठा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा तबब्ल ९ गॅस टाक्यांचा स्पोट झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब अशी की, गॅस चोरीचा काळाबाजार सुरु असताना दी दुर्घटना घडली. ताथवडे शहरात हा स्फोट झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शाळेच्या तीन वाहनांना आग लागून जळून खाक झाली. रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पिंपरी चिचवडमधील ताथवडे परिसरात गॅस टाकीला काळाबाजार करत असताना नागिकांचा गोंधळ उडाला. नागरिकांनी घराबाहेर धावा घेतला. आगीचा उडालेला भडका पाहून गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांनी देखील घटनास्थळावरुन पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोध सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in