Pune GBS Outbreak: बारामती येथील २१ वर्षीय विद्यार्थिनीचा जीबीएसमुळे मृत्यू, महाराष्ट्रात मृतांची संख्या १० वर

पुण्यात जीबीएसचा (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यात मंगळवारी (दि.१८) जीबीएसमुळे किरण राजेंद्र देशमुख (वय २१, बारामती) या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती तीन आठवड्यांपासून जीबीएसशी झुंज देत होती. किरणच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील जीबीएसमुळे एकूण मृतांची संख्या १० वर पोहोचली.
Pune GBS Outbreak: बारामती येथील २१ वर्षीय विद्यार्थिनीचा जीबीएसमुळे मृत्यू, महाराष्ट्रात मृतांची संख्या १० वर
Pune GBS Outbreak: बारामती येथील २१ वर्षीय विद्यार्थिनीचा जीबीएसमुळे मृत्यू, महाराष्ट्रात मृतांची संख्या १० वरFPJ
Published on

पुण्यात जीबीएसचा (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यात मंगळवारी (दि.१८) जीबीएसमुळे किरण राजेंद्र देशमुख (वय २१, बारामती) या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती तीन आठवड्यांपासून जीबीएसशी झुंज देत होती. किरणच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील जीबीएसमुळे एकूण मृतांची संख्या १० वर पोहोचली.

किरण ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मतदारसंघ आणि गृहनगर असलेल्या बारामती येथील रहिवासी होती. तिच्या शिक्षणासाठी ती पुण्यात सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. तेव्हा तिला हा आजार झाला. या भागात जीबीएसचे अनेक रुग्ण आढळले आहेत आणि दुर्दैवाने किरणलाही संसर्ग झाला होता. सुरुवातीला तिला अतिसार आणि अशक्तपणा यासारखी लक्षणे जाणवली, ज्यामुळे तिच्या कुटुंबियांना तिला बारामती येथे नेऊन तेथील डॉक्टरांकडे तिच्यावर उपचार सुरू केले.

बारामतीत काही काळ उपचार घेतल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसत नव्हती. तिला ज्या प्रकारे त्रास होत होता त्या लक्षणांवरून डॉक्टरांना तिला जीबीएस असल्याचा संशय आला. परिणामी त्यांनी तिला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गेली तीन आठवडे किरणवर उपचार सुरू होते. मात्र, तिची जीबीएसशी झुंज अपयशी ठरली, अखेर मंगळवारी तिचा मृत्यू झाला.

जीबीएस ही एक दुर्मिळ स्थिती आहे. या सिंड्रोममुळे स्नायु कमकुवत होतात, पायाला मुंग्या येणे, हातांमध्ये संवेदना कमी होणे, गिळताना त्रास होणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे अशी याची लक्षणे आहेत.

'फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार', जीबीएसच्या एकूण प्रकरणांपैकी ४२ पुणे महानगरपालिका क्षेत्रातील (पीएमसी) ९४ प्रकरणे पुणे महापालिकेत नुकत्याच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तर ३२ प्रकरणे ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. ३३ प्रकरणे पुण्यातील ग्रामीण भागातील आहेत आणि इतर १० जिल्ह्यांतील आहेत.

आतापर्यंत एकूण १३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३९ अतिदक्षता विभागात (ICU) आहेत १८ इतर व्हेंटिलेटवर आहेत, असे राज्य आरोग्यविभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in